प्रत्येक कलाकृती एक स्वतंत्र अनुभव असते. मग ती एखादं गाणं असेल, एखादा लेख किंवा अगदी एखादा चित्रपट सुद्धा. जितकी उत्कट अभिव्यक्ती तेवढाच दमदार आस्वाद. आणि मग त्या कलाकृतीला ना कुठल्या सीमेचं बंधन असतं ना हि भाषेचा अडसर. आता OTT च्या कृपेने अनेक भाषेतले अनेक देशातले चित्रपट कधीही पाहता येऊ लागले आणि कळलं कि त्या टिपिकल sci-fi किंवा मारधाड,हिंसा असलेल्या उथळ सिनेमां पेक्षा वेगळं अस त्यांच्या कडेही आहे सांगण्या सारखं. खूप.
असंच
काही नवीन वेगळं शोधताना
एक चित्रपट सापडला. awakening नावाचा. वैद्यकीय विषयांची आवड असल्याने मी
तो पाहायला घेतला. थोडा संथ आणि
फार काही ट्विस्ट वगरे
नसलेला एक तब्बल ३५
वर्षांपूर्वी आलेला अमेरिकेन चित्रपट. एका एकाकी मानसोपचार
तज्ज्ञाची आणि त्याच्या मनोरुग्णांची
कथा. catatonia, म्हणजे मेंदूला अजिबात शारीरिक हालचाल जमत नाही आणि
मन मात्र सगळं नोटीस करतं.
त्यावर कोणताही औषध नसतं. एकदा
एका सेमिनार मध्ये या आपल्या डॉक्टर
ला एक आशेचा किरण
सापडतो. एक औषध जे
या रुग्णांवर काम करू शकेल
असं. तो प्रयोग करतो
एकावर आणि तो यशस्वी
हि होतो.
लिओ
नावाचा एक रुग्ण या
कॅटाटॉनिक स्टेट मध्ये लहान असताना गेलेला
असतो तो तब्बल २५-३० वर्षांनी "जागा"
होतो. मधल्या काळात जग फार बदललेलं
असतं. लिओ ते "जागेपण"
अनुभवायला सुरु करतो. या
जाग्या झालेल्या लिओ च्या तोंडी
एक फार सुरेख वाक्य
येतं, "we have
got to remind them, how good it is, what life is all about. They have forgotten
what it is to be alive. They need to reminded about what they have and what
they can lose. What I feel is the joy of Life, the Gift of life, the freedom of
life. People don’t appreciate simple things of life.
किती
अचूक म्हणालाय लिओ बघा. लोक
जगणं काय आहे ते
विसरून गेली आहेत. त्यांना
आठवण करून देऊया कि
आयुष्य किती सुंदर आहे.
एखादी गोष्ट गमावल्यावरच त्याची किंमत कळते ना तसच
काहीसं. रोजच्या धावपळीतून जराशी सवड काढून आजूबाजूला
पाहिलं तर जाणवतं. अश्या
कितीतरी सुंदर गोष्टी फक्त रोज आणि
सहज घडतात म्हणून त्यांचं तिथे असणं आपण
नकळत गृहीत धरत जातो. "रुटीन"
नावाच्या डब्यात टाकून मोकळे होतो. आणि मग जायचा
दिवस जवळ येऊन ठेपतो
आणि तेव्हा कळतं, अरेच्च्या, जगण्याच्या धावपळीत खरं जगायचं राहूनच
गेलं.
ज्ञानेंश्वर
माउलींनी वृद्धावस्थेच अतिशय दारुण वर्णन करून म्हटलंय कि ,देवा, तेव्हा मला तुझा नाव
आठवण्याची हि शक्ती नसेल
म्हणून मी आत्ताच जेव्हा
धडधाकट असताना तुझी भक्ती का
करू नये. हा चित्रपट
सोप्या शब्दात हेच सांगण्याचा प्रयत्न
करतोय. चित्रपटातल्या मानसोपचार तज्ञालाही हा विचार पटतो
आणि मग त्याच्या आयुष्य
एक सुरेख वळण घेतं आणि
चित्रपट संपतो. कधी वेळ मिळाला
तर शांतपणे पहा आणि मग
होऊन जाऊदे..
संवाद
मनाचा मनाशी...
No comments:
Post a Comment